‘वाघभक्षक’ माणूस | Save Avni? Save yourself.

गेल्या आठवड्यात अवनी या वाघीणीसाठी बांद्रा येथे लोकं साधारणतः ५ च्या सुमारास जमले. जवळपास १०० जण जमले होते. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू होते , ते त्या वाघीणीसाठी होतेच पण त्याचबरोबर त्या वाघिणीच्या लहान पिल्लांसाठीही होते ज्यांचा आयुष्याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील गावांमध्ये लोकांनी फटाके फोडून जल्लोष केला असही ऐकल. सगळच गोंधळात टाकणारं होत.

आपण वर्षानुवर्षे वाघांची शिकार करत आहोत, जंगल तोडत आहोत, वाघांना तसेच अन्य वन्यजीवांना एखाद्या कोठडीत बंद केल्यासारखं ठेवत आहोत आणि मग आपणच शेवटी म्हणतो कि एका वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला. हा केवढा दांभिकपणा ?
दांभिकपणा सोडला तर विषय आहे त्या वाघिणीने १३ जणांना मारल्याचा. तर ती या आरोपात संशयित आहे, आरोपी नाही, त्यामुळे तिने १३ जणांना मारल्याचा छाती ठोकून जो प्रचार केला जातो तो लोकांनी थांबवावा, तिने आतापर्यंत ५ जणांना मारल्याचे पुरावे आहेत त्यामुळे ते आपण सत्य म्हणून गृहीत धरू.

आता ५ जणांना मारल्याची शिक्षा तिला मारूनच द्यायची ठरवली तर हा न्याय माणसाला लैच भारी पडू शकतो कारण आपण लाखो, करोडो जमाती नष्ट केल्या आहेत. हा युक्तिवाद आपण कधीच सहन करणार नाही हे गृहीत धरूनच पुढच लिखाण करत आहे.

तर या वाघिणीला मारण्याऐवजी तिला बेशुद्ध करता आलं असत व तिला दुसऱ्या जंगलात ठेवता आलं असत, नाही पण तिला सरळ पोईट ब्लेंक रेंज वरून ठार करण्यात आल , सुप्रीम कोर्टानेही आदेष दिलेला कि तिला पहिल्यांदा बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला जावा. पण हल्ली सुप्रीम कोर्टाला आपल सरकार किवा लोक कुठे मानतात म्हणा ?
तर शेवटी या वाघिणीची हत्या करण्यात आली. त्यासाठी महिनोंमहिने करोडो रुपये खर्च करण्यात आले, इटालियन कुत्रे वैगेरे बोलावण्यात आले, मुलींना आकर्षित करण्यासाठी वापरला जाणारा हजारो रुपयांचा सेंटही वापरण्यात आला. Paragliders ना हजारो रुपये देण्यात आले पण तरीही अवनीला पकडण्यात सगळेच अपयशी ठरले. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, या वाघिणीची शिकार करण्यासाठी अशा एका शिकाऱ्याला बोलावण्यात आल ज्याच्यावर नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवण्याचा गंभीर आरोप तसेच अनेक प्राण्यांची हत्या करण्याचाही आरोप आहे, या महान माणसाच नाव शफत अली खान.

एकीकडे वाघांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे असे उपद्व्याप करायचे, हा खोटारडेपणा फक्त या सरकारचाच नाही तर सगळ्याच पक्षांनी केला आहे .

वाघांची संख्या वाढवायची असेल तर त्याचं जंगल क्षेत्रही वाढवायला हव ही एक साधी बाब आहे. पण या सामान्य तथ्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे.

याबाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी news चेनेल्स चा. प्रत्येक news चेनेल हे या वाघिणीला दोषी ठरवून तिच्या विरोधात अक्षरशः दर दिवशी जणू campaign करत होत.

मिडियाच काम लोकांमध्ये प्रबोधन घडवण हेही आहे. पण सगळाच मिडिया त्या वाघिणीला नरभक्षक ठरवण्याचा मागे लागला होता.

प्रश्न आता हा आहे कि त्या वाघिणीच्या २ पिल्लांच काय ? तर त्यांनाही मारून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय हे आत्ताच कुठेतरी वाचल.

एकूणच हे सर्व अतिशय भयानक आणि हृदयद्रावक आहे.

निसर्गावर फक्त आपलाच हक्क आहे का ?

जो न्याय त्या वाघीणीसाठी लावला गेला तोच न्याय जर माणसावर लावला तर आपण कधीच नामशेष झालो असतो हे सगळ्यांनी ध्यानात ठेवाव.

त्या वाघिणीला तर आता आपण न्याय कधीच देऊ शकणार नाही पण तिचे बछडे अजूनही जिवंत आहेत आणि त्यांना वाचवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज उठणं गरजेचं कारण आपल्या आंदोलनं केल्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळत नाही.
तर मुंबईत अवनी व तिच्या पिल्लांचा आवाज बनण्यासाठी हजारो लोकं वांद्रे समुद्रकिनाऱ्यालगत, R.K.Lakshman यांच्या ‘कॉमन मॅन’ पुतळ्या जवळ साधारणतः संध्याकाळी 4 वाजता जमणार आहेत. त्यात तुमच्या सहभागाला अनन्यसाधारण महत्व. जर भारतातील वाघांना आणि फक्त वाघांना नव्हे तर प्रत्येक जगली प्राण्यांना तसेच जंगलांना वाचवायच असेल तर या ११ नोव्हेंबर ला. एकत्र आपला आवाज बुलंद करू आपल्या पृथ्वीसाठी. कारण आज जी वेळ या वाघांवर आली आहे तीच वेळ उद्या मुंबईतल्या बिबट्यांवर येऊ शकते.

-Hrishikesh Patil is a blogger for Let Mumbai Breathe

Leave a comment